#Accident
केज तालुक्यातील विद्यार्थ्याचा पनवेल येथे अपघाती मृत्यु…..!

केज दि.२८ – तालुक्यातील देवगाव येथील वैभव गोविंद मुंडे वय १८ वर्ष या युवकाच पनवेल नवी मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील देवगाव येथील वैभव गोविंद मुंडे हा इलेक्ट्रॉनिक आय.टी.आय चे शिक्षण घेण्यासाठी पनवेल नवी मुंबई येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.मंगळवार दि.२६ जूलै रोजी आपल्या मित्रा सोबत सांयकाळी रेल्वेमार्गावरून फिरत अस्ताना वैभव यास पाठीमागून येणा-या रेल्वे इंजिनचा धक्का लागला व तो युवक रेल्वे पटरीवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.वैभवच्या निधनाबद्दलची माहीती त्याच्या सोबत असलेल्या मित्राने वैभवच्या वडीलांना माहीती दिल्यानंतर वैभवच्या नातेवाइकांनी पनवेल येथे जाऊन बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला.
बुधवारी सांयकाळी देवगांव येथे वैभववर अंतिम संस्कार करण्यात आले. वैभवच्या पश्चात आई-वडील,आजी आजोबा,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.