राजकीय
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुतणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट…..!
मुंबई दि.२९ – मुख्यमंत्री एकनाश शिंदे गटाला आता थेट ठाकरेंच्या घरातूनच पाठिंबा मिळाला आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे सख्खे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला पाठींबा दिला आहे. व्यवसायाने वकिल असलेले निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार आहे. निहार ठाकरे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे.
निहार बिंदूमाधव ठाकरे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई देखील आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील आणि निहार ठाकरे यांचा 2021 मध्ये विवाह झाला. मुंबईत त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला होता.
निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहेत.