महाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषद आता तालुका संपर्क अभियान राबविणार…..!

1 / 100
पुणे दि. ४ – राज्यातील तालुकास्तरावरील पत्रकार संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात तालुका संपर्क अभियान राबविण्याचा महत्वाचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील यांच्यासह राज्यातून पन्नासवर पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
           तालुकास्तरावरील पत्रकारांवर जास्त अन्याय होतात, हल्ले होतात. मात्र त्यांचा आवाज वरपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेने थेट तालुक्यांना मान्यता देत ते परिषदेशी जोडून घ्यावेत अशी सूचना अनेकांनी केल्यानंतर त्यादृष्टीने यंत्रणा उभी करून तसा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. त्यासाठी तालुकास्तरावरील अध्यक्षांची नावे जमा करून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. तीन तालुक्यांचा एक गट करून एक संपर्क प्रमुख नेमला जाईल. विभागीय सचिव आणि जिल्हास्तरीय प्रसिध्दीप्रमूख यांच्या देखरेखीखाली नवी व्यवस्था कार्यान्वित केली जाणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. तालुके थेट परिषदेशी जोडले गेले तर सदस्य संख्या दुप्पट होईल आणि परिषदेची शक्ती कित्येकपटीने वाढेल असे मत उपस्थित अनेक सदस्यांनी व्यक्त केले.
                     तसेच तालुका संपर्क अभियानासाठी अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती यावेळी गठीत करण्यात आली आहे. राज्यातील तालुका संघांनी अनिल महाजन (+91 79728 08193) किंवा अनिल वाघमारे (+91 98 22 548696) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या अधिवेशनासाठी तीन प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये पिंपरी – चिंचवड तालुका पत्रकार संघ, उदगीर तालुका पत्रकार संघ आणि नगर जिल्ह्यातील पत्रकारांचा समावेश आहे. या तीनही ठिकाणी कशी व्यवस्था होऊ शकेल यासाठी स्वतंत्रपणे तीन समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्या संबंधीत गावांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करतील आणि त्याचा अहवाल परिषदेला देतील. त्यानंतर परिषद निर्णय घेईल. मात्र एकदा जाहीर झालेले अधिवेशन कोणत्याही परिस्थीतीत रद्द होणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले..
        डिजिटल मिडियातील पत्रकारांची  वाढती संख्या लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारीत डिजिटल मिडिया परिषद सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. डिजिटल मिडियातील पत्रकारांची एक बैठक लवकरच मुंबईत घेण्यात येणार असून त्याची जबाबदारी राजा आदाटे आणि अनिल वाघमारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
बैठकीत परिषदेने तयार केलेल्या ध्वजास मंजुरी देण्यात आली.  येत्या अधिवेशनात पहिल्यांदा ध्वजारोहण केले जाईल. बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हा अध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close