#Judgement
खा. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी…..!
मुंबई दि.८ – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना खासदार याना पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर आज युक्तिवाद पार पडल्यांनंतर संजय राऊतांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊतांचा जामिनीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ईडीने 1 ऑगस्टला संजय राऊत यांना अटक केली होती. न्यायालयाने प्रथम त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांच्या ईडी कोठडीत वाढ करत 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. आणि आता २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या प्रवीण राऊत याना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले असा आरोप संजय राऊतांवर आहे. त्यातील पैशातून संजय राऊत यांनी अलिबाग येथील जमीन खरेदी केली असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. याप्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचीही कसून चौकशी केली आहे.