#निधन वार्ता

”या” प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास…..!

4 / 100

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे आज (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला.

                आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती. मोरूची मावशी या नाटकाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म मुंबईत झाला. एका मुलाखतीमध्ये प्रदीप यांनी त्यांच्या कॉलेजमधील आठवणी सांगितलं होती. ते म्हणाले होते की,’कॉलेजमधील एकांकीका स्पर्धेत मी भाग घेत होते. जवळपास 20 पेक्षा जास्त बेस्ट अॅक्टरचं बक्षीस मिळालं होतं. सुरुवातीला आई-वडिलांना हे सगळं चांगलं वाटतं होतं. पण वय वाढल्यानंतर नोकरी नव्हती त्यामुळे त्यांना काळजी वाटतं होती. घरातून मला हे सांगण्यात आलं होतं की नोकरी नाही मिळाली तर बोरिवलीमध्ये रिक्षा चालवायला जायचं. मी त्यानंतर पाच सहा नोकऱ्या केल्या. एका हॉटेलमध्ये ग्लास पुसायला होतो. बँकेमध्ये टायपिस्ट म्हणून देखील मी काम केलं. मला बँकेत नोकरी मिळाल्यानंतर आईनं मला सांगितलं की तू नोकरी पण सोडायची नाही आणि नाटक पण सोडायचं नाही.’ प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close