#निधन वार्ता
केज शहरात १८ वर्षीय युवकाची आत्महत्या…….!
केज दि.११ – शहरातील मुक्ताई नगर भागातील एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ( दि. ११ ) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
केज शहरातील मुक्ताई नगर भागातील सुमित चंद्रकांत चाटे ( वय १८ ) या युवकाने नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून बुधवारी रात्री बेडरूममध्ये झोपल्यानंतर बेडरूममध्ये असलेल्या पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जमादार उमेश आघाव, जमादार श्रीकांत इनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.