क्राइम
पत्त्याच्या क्लब वर छापा, दहा जुगारी पकडले….!

बीड दि.14 – बीड पोलिसांच्या विशेष पथकाने 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजता माजलगाव शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये नागझरी गावामध्ये पत्त्याच्या क्लब वर छापा मारून दहा जुगाऱ्यांसह नगदी 37 310 रुपये तसेच चार मोटारसायकली आणि नऊ मोबाईल असे एकूण 2, 78,910 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस अमलदार किशोर गोरे, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली.