संपादकीय
केज तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात संपन्न…..!
केज दि.१५ – तालुक्यात आज विविध ठिकाणी ध्वजारोहन करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील सारणी आनंदगव येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयात शिक्षणप्रेमी नागरिक रामराजे आडसुळ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दत्तू सोनवणे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीरंग शिंदे हे होते.यावेळी संस्थेचे सचिव राहुल सोनवणे यांचीही उपस्थिती होती.या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
तालुक्यातील साळेगांव ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच अमर मुळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सरपंच कैलास जाधव, मुख्याद्यापक काळे, देशमुख, ग्रामविकास अधिकारी चोपणे, चेरमन गित्ते, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि प्रमुख व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायती सेवा सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन भालचंद्र गित्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, व्हाईस चेअरमन धोंडीराम इंगळे, मुख्याद्यापक काळे, देशमुख, ग्रामविकास अधिकारी चोपणे, माजी सैनिक वैजनाथ गालफाडे, शिवाजी इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि प्रमुख व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन मुख्याद्यापक एस. टी. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, चेअरमन भालचंद्र गित्ते, व्हाईस चेअरमन धोंडीराम इंगळे, मुख्याद्यापक प्रवीण देशमुख सर, ग्रामविकास अधिकारी ओम चोपणे, शाळा व्यवस्थापन समितीचे गोरोबा इंगळे, माजी सैनिक वैजनाथ गालफाडे, शिवाजी इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि प्रमुख व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
तसेच शंकर विद्यालयाचे ध्वजारोहन सेवा निवृत्त ऑनररी कॅप्टन रावसाहेब बचुटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच कैलास जाधव, मुख्याद्यापक प्रवीण देशमुख, उपसरपंच अमर मुळे, चेअरमन भालचंद्र गित्ते, व्हाईस चेअरमन धोंडीराम इंगळे,माजी मुख्याद्यापक राऊत सर, ग्रामविकास अधिकारी ओम चोपणे, शाळा व्यवस्थापन समितीचे गोरोबा इंगळे, माजी सैनिक वैजनाथ गालफाडे, शिवाजी इंगळे, सय्यद अकबर सर, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि प्रमुख व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
केज तहसील कार्यालयाचे मुख्य ध्वजारोहन हे तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली. तसेच गृह रक्षक दलाचे दिनकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली बँड पथकानेही सलामी दिली.
यावेळी केजच्या नगराध्यक्षा सिता बनसोड, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसीलदार लक्ष्मण धस, माजी सभापती राजेसाहेब देशमुख, नगरसेवक हारूनभाई इनामदार, हनुमंत भोसले, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.