क्राइम
पत्त्याच्या क्लबवर छापा ५८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ जुगारी ताब्यात तर ५ जण फरार…..!
केज दि.२४ – पोलिसांनी अवैद्य धंद्याविरुद्ध कंबर कसली आहे. उमरी येथे पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून ५८ हजार रु. च्या मुद्देमालासह ५ जुगारी ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी की, दि. २३ ऑगस्ट मंगळवार रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे याना खास खबऱ्या कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, केज तालुक्यातील उमरी येथे जुगाराचा खेळ सुरू आहे. या खात्रीलायक माहिती वरून सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दबंग पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलिस नाईक राजू गुंजाळ, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा, बजरंग इंगोले यांच्या जुगाराचा खेळ सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारला. पोलीसांनी छापा मारताच जुगारी पळून जात असताना पोलीस पथकाने त्यांचा शेतात पाठलाग करून पळून जाणारे पाच जुगारी ताब्यात घेतले. तसेच छाप्यात रोख १८ हजार ५३० रू. व ४० हजार रू. किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ५८ हजार ५३० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी ताब्यात घेतलेले ५ जुगारी आणि पळून गेलेले ५ फरार जुगारी अशा १० जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.