ब्रेकिंग

केज धारूर मध्ये दोन दिवसांत दोन शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच

केज दि. ५ – सतत होणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून केज तालुक्यातील बनकरंजा येथील हनुमंत व्यंकटी मुंडे  (34) या तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील रामचंद्र गणपती जायभाये या 58 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
          केज तालुक्यातील बनकरंजा येथील हनुमंत मुंडे हे मागच्या तीन चार वर्षापासून शेतात होणारे नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. त्यातच त्यांनी रविवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. तर धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील रामचंद्र जायभाय यांनीही बँकेचे कर्ज व अल्प उत्पादनाला कंटाळून  विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शेतकरी आत्महत्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close