हवामान

आजपासून ”या” जिल्ह्यांत वाढणार पावसाचा जोर…..!

4 / 100

राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता,  हवामान विभागाने वर्तवली आहे.

                          येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी  दिली आहे.

              दरम्यान ६ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया तर ७ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.तसेच 8 सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तर ९ सप्टेंबर रोजी सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इत्यादी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close