ब्रेकिंग
विहिरीत आढळला मृतदेह, केज तालुक्यातील घटना…..!

केज दि.१० – कानडी माळी ता. केज येथे गंगाराम लक्ष्मण खाडे वय (५५ वर्ष) यांचा गावा लगत असलेल्या एका विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.
गंगाराम खाडे यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरी होते. परंतु मागच्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने त्यांच्या मुलांनी इतरत्र शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. परंतु दि.१० रोजी त्यांचा मृतदेह गावालगत असलेल्या विहिरीत आढळून आला आहे. सदरील घटना नेमकी कशी घडली हे स्पष्ट झाले नसून पोलिसांना खबर दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत.