#Accident
पिंपळगाव सांगवी फाट्या दरम्यान मोटारसायकल अपघात……!
केज दि.१८ – केज- मांजरसुम्बा रोडवर असलेल्या पिंपळगाव – सांगवी फाट्या दरम्यान असलेल्या पुलावर झालेल्या दुचाकी अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
एचपीएम कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेले अहमदपूर अहमदनगर राज्य रस्त्याचे काम मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही.कांही ठिकाणी पुलावर अवघ्या कांही दिवसातच पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अधून मधून डागडुजी केली जाते. मात्र काम सुरू असताना कसल्याच प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. आणि असाच कांहींसा प्रकार पिंपळगाव सांगवी दरम्यान घडला आहे.सदर पुलावर काम केले आहे आणि त्यावर काम झाल्यानंतर पाणी टाकण्यासाठी माती टाकलेली आहे.त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.परंतु काम सुरू असल्याचे दोन्ही बाजूने कसल्याच प्रकारचे बोर्ड लावले नसल्याने रात्रीच्या वेळी माती टाकलेली दिसत नाही.आणि याचाच धोका एका दुचाकीस्वाराला झाला असून सदर मातीत मोटारसायकल गेल्याने अपघात झाला आहे.यामध्ये सदर तरुण गंभीर जखमी झाला असून बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला.परंतु ढकलून चालू कराव्या लागल्या रुग्णवाहिकेतून सदर जखमीस पायलट अतुल मुंडे व डॉ.सचिन सूर्यवंशी यांनी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मात्र सदर तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. डोक्याला गंभीर इजा असल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.