क्राइम
सरकारी वकील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…..!
केज दि.20 – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एका महिला सहायक सरकारी वकीलास ताब्यात घेतले. दिड हजारांची लाच स्विकारताना आरोपीस रंगेहात पकडले. सदर कारवाई (दि.20) मंगळवारी दुपारी धारुर न्यायालयात करण्यात आली.
धारूर येथे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा लांब (वायबसे) यांनी तक्रारदाराकडे निकालाची प्रत देण्यासाठी दिड हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम तक्रारदाराकडून स्विकारत असताना धारुर न्यायालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलिस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रविंद्र परदेशी व त्यांच्या पथकाने केली.