आरोग्य व शिक्षण
”माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाला सुरुवात…..!
केज दि.२६ – आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कल्पनेतुन महाराष्ट्रामध्ये दि.२६.०९.२०२२ ते दि.०५.१०.२०२२ या कालावधी मध्ये “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये १८ वर्षेवरील महिला, बालके व गरोदर माता यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये संपुर्ण कालावधी मध्ये उपजिल्हा रुग्णालय, केज जि.बीड येथेही सेवा देण्यात येणार असून सदर अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांनी केले आहे.
सदर अभियानात स्त्रीरोग तज्ञांमार्फत गरोदर महिलांची तपासणी,
गरोदर महिलांची शारीरीक तपासणी. ( यामध्ये वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तगट ), सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्यां, सोनोग्राफी तपासणी,१८ वर्षेवरील मुलींचे वरिल कालावधी मध्ये गर्भधारणा पुर्व काळजी, मासिक पाळी मधील समस्या, सॅनिटरी पॅडस्चा वापर, मासिक आरोग्य या विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे.
तसेच ३० वर्षावरील सर्व महिलांची रक्तदाब, मधुमेह व कर्करोगा संबंधी तपासणी, क्ष-किरण तपासणी, बालकांचे लसिकरण तसेच कोविड लसिकरण, दिव्यांग लाभार्थीना अपंगत्वाचे प्रमाणपत्र व युडीआयडी क्रमांक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नेत्र तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शालेय आरोग्य तपासणी पथका मार्फत शाळेंतील बालकांची तपासणी (यामध्ये टंगटाय, फायमोसिस, सिस्ट व इतर लघु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत ) तरी केज तालुक्यातील १८ वर्षावरिल महिला महिलांनी जास्तीत जास्त या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियाना अंतर्गत तपासणी करुन घेण्याचे आवाहन