क्राइम

दरोडेखोरांची टोळी अवघ्या चार दिवसांत जेरबंद…..!

1 / 100
केज दि.१ – मागच्या चार दिवसांपूर्वी केज ठाणे हद्दीत अंबाजोगाई ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव फाटयाजवळ कारला पिकअप आडवी लावून दरोडा टाकण्यात आला होता.परंतु पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून दरोडा टाकणारी टोळी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केली आहे.
            अधिक माहिती अशी की, दिनांक 27/09/2022 रोजी पहाटे चार वाजण्याचे सुमारास फिर्यादी धनाजी किसनराव भोसले  वय 45 धंदा खाजगी वाहन चालक रा.खतगाव ता.मुखेड जि.नांदेड ह.मु.कुरळी ता.खेड जि.पुणे हे त्यांचे सह प्रवासीसह पिक अप क्र.MH 12 TV3905 यामध्ये बसून पुणे येथे जात होते. मात्र अंबाजोगाई ते बीड जाणारे रोडवर कोरेगाव फाटयाजवळ प्रवास करत असतांना एका सिल्ह्वर रंगाचे कारने पिकअपला कार आडवी लावून त्यामधील अनोळखी आरोपीतांनी हातातील कोयत्याने फिर्यादी व साक्षीदार यांना धाक दाखवून मारहाण करून फिर्यादी व साक्षीदार यांचे कडील दागिने व नगदी असा एकुण 72370/- माल शस्त्राचा धाक दाखवून लुटून नेला अशी फिर्याद केज पोलीसांत दिली होती
                     सदर गुन्हयाचे घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, बीड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले होते. त्यावरून पो.नि.स्थागुशा यांनी दोन पथक तयार करून बीड,सोलापुर, लातुर, नांदेड, पुणे, अहमदनगर जिल्हयातील अशा पध्दतीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती घेत असतांना प्रभारी पो.नि.एच.पी.कदम, स्था.गु.शा.बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा लखन जिजाराम साळवे रा.राशिन ता.कर्जत जि.अ.नगर व त्याचे इतर साथीदारांनी केल्याचा अंदाज आला. सदर खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून लखन साळवे यास राशिन येथून ताब्यात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने सदर गुन्हा त्याचे इतर साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तुकाराम कोल्हे रा.जवळा, वैभव अजिनाथ हजारे रा.जवळा,  अविनाश परशुराम गायकवाड  हडपसर पुणे,  शुभम रमेश मोरे रा.पापडी वस्ती हडपसर पुणे यांचे मदतीने केल्याची कबुली दिली. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तुकाराम कोल्हे रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर व  वैभव अजिनाथ हजारे रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर यांना जवळा ता.जामखेड जि.अ.नगर येथून ताब्यात घेतले तर अविनाश परशुराम गायकवाड रा.सेवनहील आदर्शनगर हडपसर पुणे यास हडपसर पुणे येथून ताब्यात घेतले. शुभम रमेश मोरे रा.पापडी वस्ती हडपसर पुणे यास ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले असता शुभम यास पो.स्टे. हडपसर यांनी दिनांक 28/09/2022 रोजी हडपसर गुरनं 1174/2022 क.394 भादंवि चे गुन्हयात ताब्यात घेण्यापुर्वी अटक केलेली आहे. आरोपीस शुभम यास न्यायालयीन प्रक्रियेनंतर अटक करण्यात येणार आहे. सदर आरोपीतांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली स्वीफ्ट कार हस्तगत केली असून उर्वरित मुद्देमाल हस्तगत प्रक्रिया चालु आहे.
                    दरम्यान सदर गुन्हयातील वरील नमुद 04 आरोपीतांना पो.स्टे.केज गुरनं 436/2022 कलम 395 भादंवि चे तपासकामी पो.स्टे.केज येथे हजर केले असून पुढील तपास पो.स्टे. केज व स्था.गु.शा.चे पथक करीत आहे. सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close