ब्रेकिंग
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर गोंधळ…..!

बीड दि.५ – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर दसरा मेळाव्यात गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा होता. मात्र पंकजा मुंडे यांचं भाषण होताच कार्यकर्त्यांनी मंचाजवळ धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी गर्दी केली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.
दरम्यान, सदरील गोंधळ निर्माण का झाला याचे कारण अद्याप समोर आले नसून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.