#Accident
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू…..!
केज दि.११ – माहेरी आलेल्या २९ वर्षीय महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बेलगाव ( ता. केज ) येथे सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
सारूळ ( ता. वाशी जि. उस्मानाबाद ) येथील अंजली उर्फ टकुबाई ज्ञानदेव दराडे ( वय २९ ) ही महिला काही दिवसांपूर्वी माहेरी बेलगाव ( ता. केज ) येथे आली होती. सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी ती बेलगाव शिवारातील पाटील ग्रुपच्या सार्वजनिक विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच फौजदार वैभव सारंग, बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा गळाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या महिलेस दोन मुले आहेत.