#Accident

टेम्पो – मोटारसायकल अपघातात दोघे ठार…..!

1 / 100

बीड दि.१२ – बांधकाम मिस्त्री व मजुर महिला एका दुचाकीवरून जाताना टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना दुपारी बीड शहरापासून जवळच मांजरसुंबा रस्त्यावरील बायपास चौकात घडली.

कालिदास विठ्ठल जाधव ( वय ३८ वर्ष ) रा. शेलगाव गांजी ( ता. केज ) बांधकाम मिस्त्री तसेच मजुर महिला अनिता भारत सरपते रा. धानोरा रोड, बीड अशी मयतांची नावे आहेत. हे दोघे मांजरसुंबा येथे बांधकामावर चालले होते. दरम्यान ते बीड शहराच्या बाहेर येताच बायपास जोडला जातो त्या चौकात आले असता आयशर टेम्पो व  दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक होताच दुचाकी टेम्पोच्या खाली अडकून लांबपर्यंत फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे तर, महिलेचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला.                                                     घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टेम्पो बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी नियमित अपघाताच्या घटना घडत असल्याने येथे उड्डाण पूल करावं अशी मागणी केली जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close