ब्रेकिंग
मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू….!
केज दि.१६ – मांजरा धरण यावर्षी भरेल की नाही अशी शंका होती.परंतु ती शंका दूर झाली असून मांजरा धरण 100% भरले असून दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
मांजरा धरण पूर्ण भरल्याने दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.45 वाजता धरणाचे 1 आणि 6 या क्रमांकाचे दोन दरवाजे 25 सेमी उघडले असून यामधून नदीपात्रात 1747.33 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
दरम्यान, अवाक पाहता यामध्ये विसर्ग कमी अधिक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून नदी काठच्या जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.