#Accident
केज तालुक्यात वीज पडून शेतकरी ठार…..!

केज दि.१७ – शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने ५५ वर्षीय शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गप्पेवाडी (ता.केज) येथे घडली.
गप्पेवाडी ( ता. केज ) येथील शेतकरी ज्ञानोबा निवृत्ती केदार ( वय ५५ ) हे रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात ज्ञानोबा केदार यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला होता. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.