आरोग्य व शिक्षण
दिवाळी पाडव्याच्या दिवशी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची मोठी घोषणा…..!

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्या मोफत देण्याची घोषणा शिक्षणमंत्री केसरकर यांनी नाशिकमध्ये केली आहे.

नाशिकमध्ये केसरकर यांनी बोलत असतांना शिक्षण क्षेत्रात पुस्तकामध्ये वह्यांची पणे जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करून सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.
मोफत पुस्तकांबरोबर वह्या देण्याचा उद्देश हा शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असेही मत केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिले जातात, त्यासोबत वह्या देण्याचा निर्णय झाल्याने सर्वसामान्य कुटुंबाला दिलासा मिळणार आहे.याशिवाय पटसंखेअभावी अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्याने शिक्षणविभागावर नाराजी व्यक्त केली जात होती.