व्हायरल

एसटी महामंडळाच्या धारुर आगाराचा गलथान कारभार…….!

6 / 100
केज दि.३० – बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशाची सेवा करणाऱ्या एसटीला प्रवाशांनी आपल्या मनातुन प्रतिसाद देत अविरत पाठिंबा दिलेला आहे.परंतु अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असुन नाहक वेळ वाया घालवावा लागत आहे.
                      धारुर ते स्वारगेट पुणे या गाडीचे दिनांक ३०-१०-२०२२ रोजी  सकाळी साडेसात वाजताच्या गाडीचे तिकीट पञकार चंद्रकांत पाटील यांच्या मुलांसाठी आॕनलाईन आरक्षीत केले होते. केज बसस्थानकात सकाळी सात वाजल्यापासुन गाडीची वाट पहात उभे असताना धारुर आगाराची एकही गाडी स्वारगेट मार्गे रवाना झाली नाही. नंतर साडेनऊ वाजता विभागीय नियंञक यांना चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व आगार प्रमुखाचा नंबर दिला.मात्र तब्बल सहावेळा फोन लावुनही फोन उचलण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. शेवटी केज नांदुर चौसाळा मार्गे साडेनऊ वाजता वेगळ्याच गाडीत बसवले.
          दरम्यान, वाहक शिंदे यांना विनंती करुन तिकीट बदली करुन देऊन ज्या गावाला जायचेच नाही त्या गावाचा प्रवास करीत महामंडळाच्या कारभारावर नापसंती व्यक्त करीत प्रवास करावा लागला. आता यापुढे एसटीचे आॕनलाईन तिकीट आरक्षीत करावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close