#Job

75 हजार पद भरतीचा मार्ग मोकळा, शासकीय आदेश जारी…..!

7 / 100
 मुंबई दि.१ – 75 हजार पद भरतीमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी करत नियम शिथील केले आहेत.  कोरोना महामारीमुळे नोकर भरतीला घातलेली 50 % ची मर्यादा शिथिल करत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतलाय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षात राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे.                                                                   सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे शासनाच्या  29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे. ज्या विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट-अ व गट-ब गट ब मधील वाहनचालक व गट-ब संवर्गातील पदे वळून सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे. सरकारने मंजूर आकृतिबंध बाजूला ठेवून नोकर भरती करण्याची भूमिका घेतली आहे ही शिथिलता पुढची वर्षभर लागू असेल.
             ज्या विभागांचा/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे.
ज्या विभाग/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग/कार्यालयांतील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे.
                          वरील(अ) आणि (ब) प्रमाणे शिथीलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभाग शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 अन्वये करण्यात येईल.
            दरम्यान,  कोणत्या विभागात अंदाजीत किती नोकर भरती होणार …?
आरोग्य खाते – 10 हजार 568
गृह खाते – 14 हजार 956
ग्रामविकास खाते – 11,000
कृषी खाते – 2500
सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
नगरविकास खाते – 1500
जलसंपदा खाते – 8227
जलसंधारण खाते – 2,423
पशुसंवर्धन खाते – 1,047

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close