क्राइम
पेट्रोलपंप सुरू होण्याअगोदरच डिझेलची चोरी…..!

केज दि.४ – तालुक्यातील मस्साजोग येथे उभारण्यात येत असलेल्या सुभद्रा पेट्रोल पंपावरून सुमारे चार हजार लिटर डिझेल चोरीला गेले असून पंप सुरू होण्यापूर्वीच चोरीची घटना घडली आहे.
तालुक्यातील मस्साजोग येथे डॉ.विजयप्रकाश ठोंबरे यांच्या सुभद्रा पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे.सदर पंप आणखी सुरूही झालेला नाही.त्यातच चोरांनी दि.३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान टॅंक मधील सुमारे चार हजार लिटर डिझेल चोरून नेले आहे.त्याची किंमत ३,८०००० हजार एवढी आहे.
डॉ.विजयप्रकाश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्री. सोपणे हे पुढील तपास करत आहेत.
Nice portal
Ty