क्राइम
भावानेच फोडले भावाचे डोके……!

केज दि.७ – मुलाला चापट का मारली अशी विचारणा करणाऱ्या भावाचे सख्या भावाने डोक्यात दगड मारून डोके फोडल्याची घटना आरणगाव ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आरणगाव ( ता. केज ) येथील छञभुज सुदाम जगताप ( वय ३० ) यांच्या मुलास त्यांचा सखा भाऊ नागनाथ सुदाम जगताप याने चापट मारली होती. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रभुज यांनी मुलास चापट का मारली अशी विचारणा केली असता नागनाथ याने शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर जवळ पडलेला दगड उचलून डोक्यात मारत डोके ही फोडले. शिवाय जीवे मारण्याची धमकी ही दिली. अशी छत्रभुज जगताप यांनी दिल्यावरून नागनाथ जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक राजू गुंजाळ तपास करताहेत.