#निधन वार्ता
केज शहरातील सूर्यकांत (बाबा) पाटील यांचे निधन…..!

केज दि.२६ – शहरातील वकील वाडी भागात वास्तव्यास असणारे सूर्यकांत पुरुषोत्तम पाटील उर्फ बाबा यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षे होते.
शहरातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व असलेले बाबा पाटील हे मागच्या दोन दिवसांपासून आजारी होते.त्यांना अंबाजोगाई येथे उपचारासाठी सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी शनिवारी दुपारी करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.