केज दि.२ – पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.३ डिसेंबर) रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.यामध्ये आवश्यक रक्त तपासण्याही करण्यात येणार असून गरज भासल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येईल.
तरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन पत्रकार परिषदेचे पदाधिकारी रामदास तपसे, विजयराज आरकडे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी केले आहे.
नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!