क्रीडा व मनोरंजन

विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी…..!

10 / 100
केज दि.४ – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा समाज कल्याण कार्यालय बीड व परिवर्तन सेवाभावी संस्था नेकनूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ व २ डिसेंबर २०२२ रोजी विज्ञान स्पर्धा व चित्र वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालय उमरी (ता. केज) येथील सय्यद मुबारक अकबर व शिंदे पंकज दत्ता या विद्यार्थ्यांनी सर्व दिव्यांग शाळा प्रवर्गातून विज्ञान प्रदर्शन स्पर्धेतून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्यांना अडीच हजार रुपये रक्कम जाहीर झाली असून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या  पारितोषिकाचे स्वरूप आहे.
             तसेच वाचा व चित्र वाचन स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून सर्व दिव्यांग प्रवर्गातून सय्यद मुबारक अकबर या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असून त्याला दीड हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीस मिळाले आहे.
             दरम्यान शाळेतील शिंदे बापू (विशेष शिक्षक) श्री. शिंदे, वाचातज्ञ नितीन शिंदे, कला शिक्षिका आशा हिंगे यांनी विशेष मेहनत घेतली. तर शाळेच्या मुख्याध्यापिका द्रौपदी सूर्यवंशी व शाळेतील स्टाफचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close