#Social
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या केज तालुकाध्यक्षपदी शिवराम घुले……!
केज दि.४ – राष्ट्रीय विकास महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी शिवराम घुले यांची निवड झाली असून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची मंगळवारी दि.८ नोव्हेंबर रोजी शासकिय विश्रामगृह येथे सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये केज तालुका अध्यक्ष या पदावर शिवराम अप्पाराव घुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. केज तालुक्यातील प्रत्येक गावागावत जाऊन महासंघाची शाखा सुरु करून विविध शासकीय योजनेचा लाभ तळागळातील गरजुवंत दिव्यांग व्यक्ती पर्यंत पोहचविणे व विविध बँका व अपंग विक्त महामंडळाकडुन कर्ज मिळुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच अपंगाच्या संस्था संघटना महासंघाशी संलग्न करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन करुन अपंगा मध्ये जनजागृती करून त्याचा अहवाल महासंघाच्या केंद्र कार्यालयाकडे पाठवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल विनायक गंगाधर लोंढे (राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र (राज्य संचालय), भाजपचे युवानेत विष्णू घुले व मित्र परिवाराने शिवराम घुले यांचे अभिनंदन केले आहे.