व्हायरल
नवीन सिमकार्ड घेतल्यानंतर आता ”हा” नियम होणार लागू….!
मुंबई दि.५ – आता डिजिटल व्यवहारात खूप वाढ झाली आहे. त्यामुळं आर्थिक फसवणूकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. आता या घटनांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
दूरसंचार विभाग एक नवीन नियम लागू करणार आहे. हा नियम Airtel, VI, Jio, BSNL-MTNL या सर्वच सिमकार्ड कंपन्यांसाठी असणार आहे.
हा नियम असा आहे की, कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड सक्रिय झाल्यानंतर ते पुढील 24 तास बंद असणार आहे. यावेळी सर्व काॅल्स-एसएमएसची सुविधाही बंद असणार आहे. या नियमामागे फसवणूक रोखण्याचा उद्देश आहे. हा नियम पुढच्या 15 दिवसांत लागू होऊ शकतो.
सध्या आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. फसवणूक करणारा नवीन सीम घेऊन ग्राहकांचे जुने सिम बंद पाडतो. मग नवीन सिममधून ओटीपी मिळवून फसवणूक केली जातीय. ही फसवणूक रोखण्यासाठी आता नवीन सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तास ग्राहकाची पडताळणी केली जाईल. ग्राहकानं जर सिमची पडताळणी करण्याची विनंती नाकारली तर ते सिम पुढं सक्रिय होणार नाही.
दरम्यान, 5G सेवा अपडेट करताना देखील आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं दूरसंचार विभागाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.