क्राइम
केज पोलिसांची दिशाभूल करणा ऱ्यांना घडवली अद्दल……!
केज दि.७ – पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन येतात व त्यानुसार पोलीस घटनास्थळी जाऊन परिस्थिती चा आढावा घेतात.परंतु समाजातील कांही लोक विनाकारण पोलिसांचा नंबर डायल करून पोलीस यंत्रणेला परेशान करण्याचाही प्रयत्न करतात.आणि असाच एक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला असून फेक कॉल करणाऱ्या दोघांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
तालुक्यातील लाखा येथून दि.६ डिसेंबर रोजी दुपारी वाळू चोरी होत असल्याचा कॉल आला. त्यानुसार पोलिसांचा फौजफाटा सादर ठिकाणी दाखल झाला.मात्र सदर ठिकाणी वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आला नाही.उलट पोलीस त्या ठिकाणी गेले असता दोघे पोलिसांकडे बघून हसू लागले.त्यामुळे पोलिसांना फेक कॉल असल्याचा संशय आला.आणि सदर कॉल हा अश्रूबा भास्कर चव्हाण व शिवकुमार संदीपान घाडगे यांनी दारूच्या नशेत केल्याचे लक्षात आले.
दरम्यान, फेक कॉल करून पोलिसांची दिशाभूल केली म्हणून सहाय्यक फौजदार रमेश शंकरराव सानप यांच्या फिर्यादीवरून वरील दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गुंजाळ हे पुढील तपास करत आहेत.