#निधन वार्ता
पत्रकार अरेफोद्दीन काझी यांचे निधन…..!
केज दि.८ – अनेक वर्षे केज शहरात वास्तव्यास असणारे आणि साप्ताहिक केज रिपोर्टर चे संपादक अरेफोद्दीन काजी यांचे रविवार दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी आंबेजोगाई येथे ह्रदय विकाराच्या धक्याने निधन झाले.
अरेफोद्दीन काजी यांनी केज शहरात अनेक वर्षे पत्रकारिता केली. ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनातही अनेक वर्षे सक्रिय होते. केजच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी केलेल्या आंदोलनात ते सहभागी असायचे. गेली आठ वर्षांपासून ते आंबेजोगाई येथे सहकुटुंब राहत होते. केज शहरात व परिसरात त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. त्यांच्या मागे पत्नी व एक विवाहित मुलगी आहे. आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात केज तालुका पत्रकारिता सहभागी आहे.