ब्रेकिंग
१९ वर्षीय युवकाची विष प्राशन करून आत्महत्या……!

केज दि.९ – वडिलांच्या नावे बँकेचे असलेले कर्ज फेडायचे कसे ? या विचारातून एका शेतकऱ्याच्या मुलाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोनेसांगवी ( ता. केज ) येथे घडली.
सोनेसांगवी ( ता. केज ) येथील निलेश शिवाजी जाधव ( वय १९ ) याच्या वडिलांच्या नावे वैद्यनाथ बँक, स्टेट बँकेचे व सेवा सोसायटीचे कर्ज होते. शेतातील सततच्या नापिकीमुळे वडिलांच्या नावे असलेले कर्ज कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त बनला होता. त्यातून त्याने टोकाची भूमिका ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल माणिक जाधव यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.