केज शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पाठीमागे वास्तव्यास असलेल्या जयश्री दशरथ काळे यांची दुचाकी ( एम. एच. ४४ एन. ४०८८ ) ही १३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घरासमोर लावली होती. शहरातील खैऱ्याचा मुलगा पापा याने ही २० हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. जयश्री काळे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सोनवणे तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत केज शहरातील वकीलवाडी येथील दिनकर शामराव वायबसे यांनी १२ डिसेंबर रात्री त्यांची दुचाकी ( एम. एच. १२ एम. पी. ८१०३ ) ही घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ही २० हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. दिनकर वायबसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार श्रीकांत चौधरी करताहेत.