क्राइम
मुलाने फोडले वडिलांचे डोके……!

केज दि.१७ – सुनेला शिवीगाळ का करतोस अशी विचारणा करणाऱ्या वडिलास शिवीगाळ करीत मुलाने खोऱ्याचा दांडा डोक्यात मारून वडिलांचे डोके फोडल्याची घटना गदळेवाडी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी मुलाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गदळेवाडी ( ता. केज ) येथील सचिन मधुकर जाधव हा १७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास त्याची पत्नी अश्विनी हिस तू येथे कशाला काम करतेस असे म्हणत शिवीगाळ करीत होता. यावेळी त्याचे वडील मधुकर बाबुराव जाधव ( वय ७० ) व त्यांची पत्नी या दोघांनी सुनेला का शिवीगाळ करतोस अशी विचारणा केली असता सचिन जाधव याने तुम्ही आमच्या पती – पत्नीच्या भांडणात पडू नका असे म्हणत शिवीगाळ करीत वडील मधुकर जाधव यांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारून डोके फोडले. अशी तक्रार मधुकर जाधव यांनी दिल्यावरून त्यांचा मुलगा सचिन जाधव याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक शिवाजी उगलमुगले करत आहेत.