#Accident
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच….!

अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज रात्री याच रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले असून एका अपघातात तिघांचा मृत्यू तर दुसऱ्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महामार्गावरिल पोखरी फाटा येथे टेम्पो, कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला या अपघातात पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर याच रस्त्यावर बर्दापूर जवळ झालेल्या कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हे दोन्ही अपघात एकाच रस्त्यावर एक तासाच्या अंतराने झाले असून ऊसाच्या ट्रॅक्टरला रिफलेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.