आपला जिल्हा
केज तालुक्यातील ”या” गावासह शहरातील ”तो” भाग कंटेन्मेंट म्हणून घोषित
काळजी घेण्याचे आवाहन
केज दि.20 जिल्ह्यातील आज आलेल्या 24 बाधित रुग्णांपैकी केज तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कळम अंबा येथील 1, केज शहर 1 तर होळ येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे इतरत्र संसर्ग वाढू नये यासाठी कळम अंबा हे गाव तर केज शहरातील अंबाजोगाई रोडवरील भारत गॅस एजन्सी, शालिमार हॉटेल परिसरातील आनंद नगर हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मच्छीन्द्र सुकटे यांनी काढले आहेत. तालुक्याचा आकडा ही दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.