आरोग्य व शिक्षण
दहावी बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर…..!

बीड दि.३० – दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी व इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे.