#Accident

केज – कळंब रोडवर रिक्षाचा अपघात….!

9 / 100

केज दि.३१ – केज पासून दोन किलोमीटर अंतरावर केज कळंब रोडवर एक रिक्षा पलटी झाला असून त्यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

              दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान केज कळंब रोडवर शंकर पवार (रा. जाधव जवळा ता.केज) नामक व्यक्तीच्या रिक्षाला (MH 22 U 8357) अपघात झाला. रोड पासून सुमारे 50 फूट अंतरावर सदरील रिक्षा खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाला आहे. शंकर पवार यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तर पुढील उपचारासाठी इतरत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
        दरम्यान, सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close