क्रीडा व मनोरंजन
व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश….!

केज दि.१ – औरंगाबाद विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष १५०० मी. धावणे क्रीडा प्रकारात लाडेवडगाव येथील व्यंकटेश माध्यमिक विद्यालयातील कु. शेप रूपाली अशोक (प्रथम ) क्रमांका ने विजयी होऊन राज्यस्तरीय क्रीडा प्रकारामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
सदरील विद्यार्थिनीने शाळेचे नाव औरंगाबाद विभागामध्ये झळकावले त्याबद्दल संस्थेचे सचिव पंढरी शेप तसेच मुख्याध्यापक अरुण शेप व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार करून तिच्या राज्यस्तरीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या .