संपादकीय
राजकुमार देशमाने सेवानिवृत्त…..!

केज दि.६ – येथील रहिवाशी देशमाने राजकुमार सुरेशराव देशमाने हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग लातूर येथून नियत वयोमानाप्रमाणे दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.
राजकुमार देशमाने हे मूळ केज येथील रहिवासी असून त्यांनी आतापर्यंत केज, परळी, येडशी, लातूर मनपा तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग लातूर येथे अशी एकूण ३५ वर्षांची यशस्वी सेवा पुर्ण केली. देशमाने यांच्या सेवानिवृत्तीबद्दल लातूर येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते.याप्रसंगी त्यांच्या मातोश्री, उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.