#important
शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करा – विक्रम डोईफोडे….!
केज दि.१२ – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विलंबाने होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचे पगार दरमहा एक तारखेला करा अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष विक्रम डोईफोडे यांनी केली आहे.
समान काम समान वेतन या धोरणानुसार सर्व प्राथमिक शिक्षकांना विहीत वेळेत वेतन देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु शासन यात अपयशी पडत असल्याने लाखो शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.राज्यातील जवळपास सर्वच शिक्षकांनी वेगवेगळ्या बँकेतुन गृह,शैक्षणिक कर्ज व इतर कर्ज घेतलेले असतात. शासनाकडुन होत असलेल्या अनियमीत वेतनामुळे बँकेचे हप्ते वेळेवर पोहचत नसल्यामुळे बँकेत सिबील खराब होत आहे. यामुळे शिक्षक तणावाखाली आहेत.तसेच अनेक शिक्षकांचे पाल्य उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात, राज्यात शिक्षण घेत आहेत त्यांना विहीत वेळेत मदत न पोहोचल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांना दिवाळी विनावेतन साजरी करावी लागली होती.तरी शिक्षकांच्या सकारात्मक विचार करून योग्य मार्ग काढावा व शिक्षकांचे वेतन एक तारखेला कसे होतील हे बघावे अशी मागणी शिक्षक परिषदेने केज तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथज₹ शिंदे,उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अप्पर मुख्य सचिव रणजितसिंहज देओल, सुरज मांडरे व शिक्षण संचालक शरद गोसावी यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर विक्रम डोईफोडे, किशोर भालेराव, आर.एस.कांबळे, किरण जगदाळे,विष्णू यादव,विनायक ढवळशंख, छाया जाधवर, माधुरी उंडाळे व इतरांच्या सह्या आहेत.