क्रीडा व मनोरंजन
केज तालुक्यातील विद्यार्थ्यास तलवारबाजी मध्ये ब्रॉंझ पदक…..!

केज दि.१४ – तालुक्यातील जानेगाव येथील शेतकरी कुटुंबातील कार्तिक रामप्रसाद चटप या विद्यार्थ्यांने जिद्द व मेहनतीच्या जोरावर तलवारबाजीत ब्रॉंझ पदक मिळवून केज तालुक्याच्या वैभवात भर टाकली आहे.
कातिर्क चे आई वडिल शेती करतात. परंतु शेती करत असताना त्यांनी मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून कार्तिकला संत मिराबाई शाळा औरंगाबाद या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवले. कार्तिक सध्या इत्ता आठवी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. केरळ येथील कोची या ठिकाणी १० जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान झालेल्या २४ व्या नॅशनल ज्युनियर तलवारबाजी स्पर्धेमध्ये कार्तिकने ब्रॉंझ पदक पटकावले.
यापुर्वी ही कार्तिक ने क्रिडा संकुल अहमदनगर येथे झालेल्या २४ व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत फॉइल फॉईल या प्रकारात कांस्य पदक मिळवले होते.त्याच्या या यशाबद्दल कार्तिक केजसह बीड जिल्ह्यात सर्वत्र कौतूक होत आहे.