#Accident
कदमवाडी फाट्यावर कारचा अपघात…..!

केज दि.20 – नगरहून लातूर कडे निघालेली कार केज पासून पाच किलोमीटर अंतरावर आली असता एका मुख्य विद्युत वाहिनीच्या पोलला धडकली. यामध्ये पोल वाकून तारा खाली आल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कसल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
नगरहून रात्रीच्या वेळी एक कार (MH 17 AZ 8721) लातूरकडे निघाली होती. मात्र केज जवळील कदमवाडी फाट्यावर आली असता पहाटेच्या सुमारास सदरील कार चालकाला डुलकी लागल्याने सदरील अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र चालक सुदैवाने बचावला असून पुढील अनर्थ टळला.