महाराष्ट्र

जुन्या पेन्शन बाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य……!

10 / 100
 मुंबई दि.२२ – जुन्या पेन्शन योजनेबाबत  आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
                 सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता आहे.  जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे.  शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारचे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close