राजकीय

लातूरमध्ये प्रा. किरण पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात…..! 

6 / 100
लातूर दि.२३ – मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप व  राज्य शिक्षक संघटना ,महायुतीचे उमेदवार प्रा. किरण नारायणराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात खा. सुधाकर श्रूंगारे,आमदार रमेशअप्पा कराड,माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,शैलेश भैया लाहोटी,भाजप महानगर शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी जि. प. सदस्य राहुल भैय्या केंद्रे, संघटन सरचिटणीस दिग्विजय काथवटे, अशोक काका केंद्रे, अमोल पाटील, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, विनायक पाटील,शहर सरचिटणीस भाजप शिरीष कुलकर्णी,प्रवीण सावंत,सभापती जि प लातूर रामभाऊ तिरुके,दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, बापूराव राठोड आदींच्या उपस्थितीत सकाळी सुरू झाला.
                यावेळी खासदार सुधाकर श्रूंगारे यांनी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी  योग्य उमेदवार किरण पाटील हेच आहेत.सर्व भाजप आता सक्रियपणे कामाला लागली आहे.  विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बोलतांना आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले प्रा. किरण पाटील हे जमिनीवर राहून क्रियाशीलपणे काम करणारे आहेत.सर्वांनी एकत्र येऊन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        संवाद दौऱ्यात भाजप, महायुतीचे पदाधिकारी,शिक्षक संघटना शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close