#Accident
विजेचा शॉक लागून पतीपत्नी चा मृत्यू…..!

केज दि.२५ – तालुक्यातील पिंपळगाव येथे ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि त्यांची पत्नी सिंधुबाई सुरवसे हे दोघे पती-पत्नी बुधवार दि. २५ जानेवारी रोजी पहाटे ४ च्या दरम्यान विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्या चे समोर आले आहे.

घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे दाखल झाले असून घटना नेमकी कशी घडली याचा उलगडा पोलीस तपासात होईल.