केज तालुक्यातील बोरगाव ( बु. ) येथील दयानंद संतोष आरकडे ( वय २४ ) या तरुणाचे इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. तो अविवाहित असून शेळ्या, म्हैस सांभाळत होता. तर शेतात मजुरीने ही जात होता. रविवारी शेतात मजुरीने जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. त्याने उत्तरेश्वर नवनाथ गालफाडे यांच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी निदर्शनास आले. त्यानंतर मयताचे मामा मधुकर सुकाळे यांनी पोलिसांना माहिती दिली. बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.