आपला जिल्हा
केजचे एपीआय शंकर वाघमोडे यांची बदली……!

केज दि.६ – मागच्या काही दिवसापासून केज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे यांची बदली झाली असून ते आता गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील पोलीस स्टेशनला जाणार आहेत. तर केज पोलीस स्टेशन साठी आंबेजोगाई ग्रामीणचे पीआय बाळासाहेब नारायण पवार हे येणार असून आपल्या पदाचा कार्यभार घेतील. केज येथे कार्यरत असलेले एपीआय संतोष मिसळे यांचीही अंबाजोगाई येथे बदली झाली आहे.
मागच्या काही महिन्यापासून शंकर वाघमोडे यांनी आपली कामातून ओळख निर्माण केलेली होती. गुन्हेगारांवर चांगल्या प्रकारे त्यांनी वचक बसवला होता तर सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर त्यांचा भर होता कारण लहान वयातच वळण लागलं तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण होते अशा विचारातून ते काम करत होते.